अश्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणे हे मानसिक रुग्णतेचे लक्षण आहे. मग ते कोणी करणारा असो किंवा षडयंत्र करून करायला लावणारा असो आश्या मानसिकतेचा तीव्र शब्दात निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. आश्या मनोरुग्णांनच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवला पाहिजे. जेणे करून पुन्हा असे प्रकार घडता कामा नये.
देशभरात भारतीय संविधान किंवा कोणत्याही महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना होते तेंव्हा संपूर्ण देशभरातून सर्वप्रथम महाराष्ट्रातील बौध्द समाजआंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी कशाचीही पर्वा ना करता रस्त्यावर उतरतो,आणि आपला निषेध नोंदवतो दुर्दैव्याची गोष्ट ही आहे कि, आश्या आंदोलनामध्ये कोणत्याही इतर जातीची किंवा धर्मांची मदत मिळत नाही. बौध्द समाज एकटा पडला जातो. देश्यातील अनेक जाती,धर्माना सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यक्तीस्वातंत्र्य संरक्षण याच संविधानाने दिले आहे. तरी ही महाराष्ट्रातील बौध्दा व्यतिरिक्त इतर कोणीही एवढ्या आत्मीयतेने संविधानाकडे बघताना दिसत नाही. मग इतर धार्मियांना किंवा जातीयांना संविधान नको आहे का? कि संविधान गेल्या पंच्याहत्तर वर्षात यांना कळलेच नाही? किंवा संविधान कळून सुद्धा जाणूनबुजून तटस्थ ची भूमिका पार पाडली जाते. असे असेल तर महाराष्ट्रातील बौध्द तरुणांनी आपले आयुष्य का बरबाद करुन घ्यायचे.या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आता बौद्धांवर आलेली आहे.प्रत्येक घटनेवर भावनाप्रधान होऊन केलेली आंदोलणे मोर्चे या मुळे गेल्या साठ वर्ष्यात अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अनेक तरुणांनी कालांतराने व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपविले आहे. अनेक तरुण वर्षानुवर्षे तुरुंगामध्ये सडत आहेत. काय बाबासाहेबाना खरंच हे अपेक्षित होते,मुळीच नाही. ज्यांना खरोखरच बाबासाहेब कळले त्यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनात परिवर्तन आणले आहे. प्रगती केली आहे.महाराष्ट्रातील बौध्द समाजाने आता आंदोलनाचे तंत्र बदलले पाहिजे. भावनाप्रधान होण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे, राजकारण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यानुसार आपली ध्येयधोरणे ठरवली पाहिजेत.जग प्रचंड वेगाने बदलतय आपणही अपडेट व्हायला पाहिजे. तरच पुढील पिढीला निकोप चळवळ देऊ शकू आन्यथा विनाश अटळ आहे.
परभणी येथील घडलेली घटना खूपच निंदनीय आहे. अशी घटना घडवणाऱ्याला कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि बौध्द समाजाने शांततेच्या माध्यमातून नेषेध नोंदवला गेला पाहिजे.
जय भीम
विनोद निकाळजे
राष्ट्रीय नेते आणि ईशान्य भारत प्रभारी
आरपीआय (आठवले )
Leave a Reply